मुंबई : बॉलिवूडची 'मर्दानी' राणी मुखर्जी लवकरच आपला आगामी चित्रपट 'मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी राणी मुखर्जी परदेशात रवाना झाली आहे. 'मेरे डॅड की मारुति' या चित्रपटातून ओळख निर्माण करणाऱ्या दिग्दर्शिका आशिमा छिब्बर या चित्रपटाचं चित्रिकरण करणार आहेत. दरम्यान, एका आईचा एका देशाविरोधातील संघर्ष या चित्रपटातून दाखवला जाणार आहे. 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 43 वर्षीय अभिनेत्री चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी परदेशात रवाना झाली आहे. बऱ्याच दिवसांच्या ब्रेकनंतर राणी मुखर्जी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. रानी यापूर्वी 2019 मध्ये रिलीज करण्यात आलेल्या 'मर्दानी 2' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी मुखर्जी येत्या काही दिवसांत 'मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे'चं शुटिंग पूर्ण करणार आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी राणी जवळपास महिनाभर देशाबाहेर राहणार आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, राणीनं आगामी चित्रपटातील आपल्या लूकसाठी खूप तयारी केली आहे. चित्रपटाचं कथानक नार्वेमध्ये 2011 मध्ये भारतीय वंशाच्या दाम्पत्यासोबत झालेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. ज्यामध्ये नॉर्वेतील अधिकारी दांम्पत्याच्या मुलांना त्यांच्यापासून वेगळं केलं जातं. राणीनं या चित्रपटासाठी खूप तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटात राणी मखर्जीच्या दमदार अभिनयाची मेजवाणी चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. कारण 'मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे' तिच्यासाठी पूर्णपणे ऑथर-बॅक्ड रोल आहे. राणीनं शूटिंगसाठी एका महिन्याहून अधिक काळ देशाबाहेर राहणार आहे. 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी मुखर्जी या प्रोजेक्टची गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत होती. हे प्रोजेक्ट राणीच्या अत्यंत जवळचं आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या घोषणेवेळी बोलताना राणीनं म्हटलं होतं की, "मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे' खऱ्या अर्थानं ह्यूमन रिजिलीयन्सची कथा आहे, आणि हा चित्रपट सर्व मातांसाठी समर्पित आहे. दरम्यान, 1997 साली प्रदर्शित झालेल्या 'राजा की आयेगी बरात' या चित्रपटातून बॅालिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत राणी अनेक चित्रपटांमधून झळकली. आजही ती अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :