Bell bottom : रंजित तिवारी दिगदर्शित बेल बॅाटम या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. बॅालिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्यांच्या स्टंटबाजीसाठी नेहमीच चर्चेत असतो. या चित्रपटातही चाहत्यांना अक्षयचे क्लासी स्टंट पाहायला मिळणार आहेत. अक्षय कुमारसोबत या चित्रपटात वानी कपूर, हुमा कुरेशी, जॅकी भग्नानी तसेच लारा दत्ता दिसणार आहेत.


बेल बॅाटम हा चित्रपट 19 ॲागस्ट रोजी सिनेमाघरात रिलीज होणार आहे. हा 80च्या दशकातील प्लेन हायजॅक झालेल्या सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेतील सिक्रेट एंजटचा रोल साकारणार आहे. 




बेल बॅाटम या चित्रपटाचा ट्रेलर 3 ॲागस्ट रोजी रिलीज झाला. चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच चित्रपटाच्या चर्चा रंगल्या आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमधील इंदिरा गांधींच्या लूकनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तेव्हापासूनच ही भूमिका साकरणारी अभिनेत्री नेमकी कोण? हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. बेल बॉटम हा चित्रपट 1984 मधील एका स्पाय थ्रिलर घटनेवर आधारित आहे. अभिनेत्री लारा दत्तानं यामध्ये भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकरली आहे. 




बेल बॉटमच्या ट्रेलरमध्ये पहिल्यांदा पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या रुपात 46 वर्षीय अभिनेत्रीच्या ऑनस्क्रिन ट्रान्सफॉर्मेशनचा खुलासा झाला आणि ट्रेलर पाहून सोशल मीडिया युजर्स हैराण झाले. मिस युनिवर्स लारा दत्ताला ट्रेलरमध्ये ओळखणं शक्यच नाही. हुबेहुब इंदिरा गांधीचा लूक लारानं साकारला आहे. मंगळवारी संध्याकाळी बेल बॉटमचा ट्रेलर रिलीज केल्यानंतर "#LaraDutta" हा हॅशटॅग टॉप ट्विटर ट्रेंडपैकी एक होता. 


लारा दत्ताचा दमदार लूकच्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा 
 
ट्विटरवर #laradutta या टॅगसह लारा दत्ताचा फोटो पोस्ट करत ही आपली मिस युनिवर्स लारा दत्ता आहे का?असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.  या लूकमध्ये लारा दत्ताला ओळखणं खरंच कठीण आहे. लारा दत्ताचा हा लूक पूर्ण करण्यासाठी ज्या मेकअप आर्टिस्टची मेहनत आहे, त्यांचंही कौतुक केलं जात आहे. इंदिरा गांधींचा हा लूक पूर्ण करण्यासाठी ज्या-ज्या आर्टिस्टनी मेहनत घेतली, त्या सर्वांचा नॅशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून सत्कार करा, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.