Jhimma 2: 'झिम्मा' (Jhimma) या चित्रपटाच्या यशानंतर झिम्मा-2 (Jhimma 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झिम्मा-2 या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानं ओपनिंग-डेला कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटाचं कथानक आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला  प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. झिम्मा या चित्रपटामध्ये अभिनेत्री  सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले यांनी देखील काम केलं होतं पण झिम्मा-2 या चित्रपटात या दोघींची भूमिका नाहीयेत. याचं कारण काय आहे? असा प्रश्न हेमंत ढोमेला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावेळी हेमंतनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


झिम्मा-2 सोनाली आणि मृण्मयी का नाहीत? 


लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये हेमंत ढोमेला प्रश्न विचारण्यात आला की, झिम्मा या चित्रपटामध्ये अभिनेत्री  सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले यांच्या भूमिका होत्या पण या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात त्या दोघी का नाहीते? या प्रश्नाला हेमंतनं उत्तर दिलं, "झिम्मा चित्रपटात सोनालीनं साकारलेलं पात्र मैथिली आणि मी साकारलेलं पात्र निखिल यांच्या गोष्टीचा शेवट गोड करण्यात आला होता. उगाच मला त्यात ड्रामा क्रिएट करायचा नव्हता. ओढून ताणून मला त्यात हवा भरायची नव्हती. तसेच रमाच्याबाबतीत आम्हाला वाटलं की, ती पहिल्या भागात ती सारखं मुलं व्हावं याबद्दल बोलत असते. त्याचं कनेक्शन देखील तुम्हाला झिम्मा-2 मध्ये दिसेल पण, जर प्रेक्षकांचे प्रेम लाभलं, तर आम्ही झिम्मा-3 बनवला तर त्यात त्या दिसतील."


झिम्मा-2 चं बॉक्स ऑफिस कलेक्शन (Jhimma 2  Box Office Collection)


'झिम्मा 2' हा चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाली आहेत. अशातच या चित्रपटानं पाच दिवसांमध्ये 6.32 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटानं  0.95 कोटींची कमाई केली.






 झिम्मा-2 या चित्रपटात सुहास जोशी, सिद्धार्थ चांदेकर,  निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर,सयाली संजीव,शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरु यांनी काम केलं आहे.या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत ढोमेनं केलं आहे.  या चित्रपटातील  'मराठी पोरी'  हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या अनेक नेटकरी या गाण्यावर रिल्स तयार करत आहेत.


Jhimma 2 : 'झिम्मा 2' गाजवतोय बॉक्स ऑफिस; पाच दिवसात केली बक्कळ कमाई