मागील वर्षी कतरिना कैफपासून वेगळं झाल्यानंतर रणबीर कपूरने वेगळं घर खरेदी केलं आणि ते सजवण्याची जबाबदारी गौरी खानवर सोपवली. गौरी खान ही प्रसिद्ध इंटिरिअर डेकोरेटर आहे. गौरीने रणबीरच्या आवडीनिवडीप्रमाणे घर अशाप्रकारे सजवलं की रणबीर तिचा जबरा फॅन बनला.
रणबीर कपूरने एक पत्र लिहून तिचे आभार मानले. यावरुनच रणबीर घराबाबत फारच इमोशनल झाला आहे. रणबीर लिहितो की, "गौरीसोबत काम करणं अतिशय प्रेरणादायी आणि मजेशीर होतं. स्वत:चं पहिलं घर कशापद्धतीने बनवावं हे मला माहित नव्हतं. पण गौरीसह काम करणं शानदार अनुभव होता, कारण पुढच्याच क्षणाला पसंतीनुसार होतं."
गौरीने रणबीरचं हे पत्र तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलं आहे. याआधी ऋषी कपूर यांनीही रणबीर कपूरचं घर सजवल्यासाठी गौरी खानचं कौतुक केलं आहे.