मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक राम गोपाल वर्मा नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. आता तर त्याने एक ट्विट करुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली आहे. तसेच ते भविष्यात देशाचे पंतप्रधान असतील अशी आपेक्षाही व्यक्त केली आहे.

राम गोपाल वर्माने ट्विट करुन म्हणलं आहे की, ''योगी आदित्यनाथ अतिशय चांगलं व्यक्तीमत्त्व आहे. मला वाटतं, ते पंतप्रधान मोदींपेक्षा उजवे आहेत. भविष्यात ते देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान असतील, अशी मला आशा वाटते.''


राम गोपाल वर्मानं आणखी एक ट्विट करुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थीत केलं आहे. रामूनं आपल्या ट्विटमध्ये, ''ट्रम्प आपल्या कार्यशैलीनं काही साध्य करोत, अथवा न करोत. पण माध्यमांनी हे निश्चित केलं पाहिजे की, ट्रम्प यांची कारकीर्द अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठा विनोद म्हणून सर्वांच्याच लक्षात राहतील.''



याआधीही राम गोपाल वर्माने महिला दिनानिमित्त वादग्रस्त ट्विट करुन सर्वांचाच रोष ओढून घेतला होता. रामूने महिला दिनानिमित्त केलेल्या ट्विटमध्ये जगातल्या साऱ्या महिलांनी सनी लिओनीप्रमाणे पुरुषांना सुख द्यावं, असं म्हणलं होतं. विशेष म्हणजे, या ट्विटमध्येही रामूनं महिला दिनाला पुरुष दिन असं संबोधलं होतं.

संबंधित बातम्या

ट्विंकल खन्नाचा योगी आदित्यनाथ यांना अजब सल्ला

होळीला राम गोपाल वर्माचं पुन्हा एकदा आक्षेपार्ह ट्वीट

राम गोपाल वर्मांचं महिला दिनी वादग्रस्त ट्वीट

माफी मागा किंवा परिणामांना सामोरं जा, आव्हाडांचा वर्मांना इशारा