मुंबई : कपूर खानदानाचं बॉलिवूडशी खूप जुनं नातं आहे. नव्या पिढीतील करिष्मा, करिना, रणबीर यांच्यानंतर आणखी एक वारसदार बॉलिवूड पादाक्रांत करण्यास सज्ज झाला आहे. यशराज फिल्म्सच्या आगामी चित्रपटातून आदर जैन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
यशराज फिल्म्सच्या नव्या चित्रपटात आदर सोबत अन्या सिंग ही नवोदित अभिनेत्रीही पदार्पण करणार आहे. हबीब फैसल या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. एका स्पेशल शोमध्ये अनुष्का आणि रणबीरने दोघांचं लाँचिंग केलं.
कपूर खानदानाचा वारस असल्यामुळे कंपूशाहीशी निगडीत प्रश्नांना त्याला सामोरं जावं लागेल, असं रणबीर कपूर म्हणाला.
22 वर्षांचा आदर हा राज कपूर यांची कन्या रिमा आणि मनोज जैन यांचा मुलगा आहे. आदरचा मोठा भाऊ अरमानने 2014 मध्ये 'लेकर हम दिवाना दिल' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.