... म्हणून शाहरुखकडून सलमानला लक्झुरिअस कार गिफ्ट
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2017 02:44 PM (IST)
मुंबई : बॉलिवूडचे करण-अर्जुन, अर्थात किंग खान शाहरुख आणि सुपरस्टार सलमान खान यांची मैत्री जगजाहीर आहे. याच मित्रत्वाच्या नात्याने शाहरुखने भावासारख्या मित्राला अत्यंत महागडं गिफ्ट दिलं आहे. किंग खानने सल्लूला लक्झरी कार भेट दिल्याचं वृत्त आहे. शाहरुखने 'ट्युबलाईट'मध्ये कॅमिओ करण्यास होकार दिल्यास, आनंद राय यांच्या चित्रपटात गेस्ट अपिअरन्स करण्याचं सलमानने मान्य केलं होतं. किंग खानने त्याचं वचन पाळलं, त्यामुळे साहजिकच सलमान शाहरुखची भूमिका असलेल्या आगामी चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे.