Shamshera Teaser : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांच्या शमशेरा (Shamshera) या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमधील संजय दत्त आणि रणबीरच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. या चित्रपटाबाबत रणबीरनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
रणबीरनं व्यक्त केल्या भावना
रणबीर म्हणाला, 'हा चित्रपट बघण्यासाठी माझे वडील आज असायला हवे होते, अशी माझी इच्छा आहे. माझ्या कामाबद्दल ते नेहमी स्पष्ट टीका करायचे. त्यांना माझे काम आवडले असो वा नसो, त्यांनी नेहमीच त्यांची प्रामाणिक प्रतिक्रिया दिली. पण हा चित्रपट बघण्यासाठी आज ते नाहीयेत. मला असा चित्रपट करण्याची संधी मिळाल्याने मी उत्साहित आहे आणि मला खात्री आहे की माझे वडिलांना माझ्याबाबत अभिमान वाटेल'
'मला एक अभिनेता म्हणून पुढे जायचे आहे आणि मला वाटते की 'शमशेरा' हे त्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे. अजून हा चित्रपट रिलीज झाला नाही. पण मला वाटतं की, प्रेक्षकांना माझी ही भूमिका नक्की आवडेल.', असंही रणबीर म्हणाला.
रणबीरचं मानधन
शमशेरा चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूरनं प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपट तो डबल रोज साकारणार आहे. रणबीरनं या चित्रपटासाठी 20 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. शमशेरा चित्रपटासाठी रणबीरनं त्याच्या बॉडी आणि लूककडे विशेष लक्ष दिलं आहे.
शमशेरा हा चित्रपट हिंदी बरोबरच तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे. 'शमशेरा' चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रानं केली आहे. 22 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता पुन्हा एकदा त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. या चित्रपटाची रणबीरचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.
हेही वाचा: