रणबीर आणि आलिया यांच्यातलं नातं आता काही लपलेलं नाही. ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणं झालं आणि त्यांच्यातली मैत्री आणखी वाढली. चांगली झाली.. रणबीरला तिच्यात एक जोडीदार दिसू लागला आणि हे दोघे अनेक ठिकाणी दिसू लागले. सध्या आलिया गंगूबाईच्या चित्रिकरणात व्यग्र झाली आहे. रणबीरने तिला एक लाखमोलाची भेट दिली आहे. सोशल मीडियावरच्या फोटोमुळे हे लक्षात आलं.
आलिया भटन सातत्याने रणबीरला पाठिंबा दिला आहे. रणबीरचे वडील ऋषी कपूर आजारी असतानाही अमेरिकेत त्यांना भेटायला आलिया रणबीरसोबत गेली होती. चिंटूसाब गेल्यानंतरही आलिया रणबीरसोबत होती. त्यामुळे दोघांनीही अत्यंत मोलाचे क्षण एकमेकांसोबत घालवले. ते एकमेकांसोबत होते. त्यांच्याताही ही केमिस्ट्री आता पुन्हा एकदा दिसली आहे. याचं कारण ठरलं रणबीरने आलियाला दिलेलं गिफ्ट. सर्वसाधारणपणे प्रियकर आपल्या प्रेमिकेला जे देतो त्या पलिकडे रणबीरने भेट दिली आहे. आलियाल रणबीरने एक इलेक्ट्रिक सायकल भेट दिली आहे. या सायकलची किंमत आहे दीड लाख. सायकलच्या कंपनीने रणबीरसोबत सायकलीचा फोटो शेअर केल्यामुळे ही गोष्ट सगळ्याना कळली. ही ई सायकल असून, ती फोल्डेबल असल्यामुळे तिची किंमत जास्त आहे.
सुशांतवर बनणाऱ्या प्रस्तावित चित्रपटांना ब्रेक; आता आधी कुटुंबियांची परवानगी घ्यावी लागणार
रणबीर आणि अलिया हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून कोणत्याही सोशल मीडियावर फार बोलताना दिसत नाहीत. याचं कारण एकतर सुशांतच्या मृत्यूनंतर सातत्याने होणारी नेपोटिझमरची टीका आणि त्यानंतर अमली पदार्थ सेवनाबद्दल कलाकारांचे जे व्हिडिओ व्हायरल झाले त्यात दिसलेला रणबीर यामुळे त्याच्यावर अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. कंगनानेही आपल्या ट्विटमधून या लोकांना आव्हान दिल्यानं सगळंच पाणी गढूळ झालं होतं.