Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. रणबीर लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) आणि ‘शमशेरा’ (Shamshera) या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतकंच नाही तर, तो लवकरच बाबा देखील बनणार आहे. यंदाचं वर्ष हे रणबीरसाठी खूपच आनंदाचं असणार आहे. यंदा रणबीरचा बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण तब्बल पाच वर्षांपूर्वी सुरु झाले होते. मात्र, हा चित्रपट आता पाच वर्षांनंतर रिलीज होणार आहे. या चित्रपटाला पाच वर्ष का लागली याचा खुलास आता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) केला आहे.


अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘शमशेरा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरला ‘ब्रह्मास्त्र’ला इतका वेळ का लागला असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देतान रणबीर म्हणाला की, या चित्रपटाच्या विलंबाचं कारण चित्रपटाची कथा आहे. या कथेमुळेच चित्रपटाला पूर्ण व्हायला उशीर लागला आहे.


काय म्हणाला रणबीर कपूर?


रणबीर कपूर म्हणाला की, ब्रह्मास्त्रला होणारा विलंबामागे इतर कोणतेही कारण नसून, चित्रपटाच्या कथेमुळेच चित्रीकरणाला उशीर झाला आहे. 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट एका वेगळ्या पार्श्वभूमीवर बनत असून, त्याला वेळ लागणारच होता. कमी वेळात चित्रपट बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम काय असेल, याचा विचार करावा लागतो. पण, ब्रह्मास्त्रला पूर्ण होण्यात वेळ लागण्यामागे कोरोनाचीही मोठी भूमिका आहे. कोरोना महामारीमुळे देखील चित्रपटाला वेळ लागला.’


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट!


‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची घोषणा ऑक्टोबर 2017मध्ये झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2018मध्ये त्याचे शूटिंग सुरू झाले. याआधी जून आणि नंतर सप्टेंबर 2019 मध्ये या चित्रपटाचे शूटिंग वाराणसीमध्ये झाले होते. या चित्रपटाद्वारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या दोघांशिवाय अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), मौनी रॉय (Mouni Roy), अक्किनेनी नागार्जुन (Nagarjun Akkineni) या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा: