Brahmastra : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी (15 जून) रिलीज झाला होता. ट्रेलरमधील वीएफएक्स, सस्पेंस, कलाकारांचे लुक्स आणि अभिनय या सर्व गोष्टींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले. पण सध्या वेगळ्याच कारणांमुळे ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एक सीनमुळे आता नेटकरी या चित्रपटला बायकॉट करण्याची मागणी करत आहेत.
ट्रेलरमध्ये एका सीनमध्ये रणबीर हा पळत येतो आणि मंदिराची घंटा वाजवतो असं दिसत आहे. यामध्ये रणबीर हा चप्पल घालून मंदिराची घंटा वाजवताना दिसतोय. त्यामुळे आता अनेक नेटकरी या चित्रपटाला ट्रोल करत आहेत.
नेटकऱ्यांचे ट्वीट:
एका नेटकऱ्यानं ट्वीट केलं, 'चप्पल घालून मंदिरामध्ये जाणं, हेच बॉलिवूडकडून अपेक्षित होतं. 'तर दुसऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'शूज घालून मंदिराची घंटा वाजवलेली दिसत आहे, हाच फरक आहे बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये साऊथ चित्रपटसृष्टी ही हिंदू संस्कृतीचा सन्मान करते. ' अनेक नेटकरी हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हा चित्रपट बायकॉट करण्याची मागणी करत आहेत.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणबीर आणि आलिया यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे देखील या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. आलियानं या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, 'आमच्या ह्रदयाचा भाग- ब्रह्मास्त्र. 09.09.2022 रोजी लवकरच भेटूयात.' ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन हे प्रोफेसर ‘अरविंद चतुर्वेदी’ आहेत आणि नागार्जुन पुरातत्वशास्त्रज्ञ च्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांचे नाव ‘अजय वशिष्ठ’ आहे. मौनीच्या पात्राचे नाव ‘दमयंती’ आहे. आयान मुखर्जीनं या चित्रपटाचा दिग्दर्शन केलं आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाची घोषणा ऑक्टोबर 2017 मध्ये झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये त्याचे शूटिंग सुरू झाले. याआधी जून आणि नंतर सप्टेंबर 2019 मध्ये या सिनेमाचे शूटिंग वाराणसीमध्ये झाले होते.
हेही वाचा :