मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अभय देओलने फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींवर सोशल मीडियावरुन जोरदार टीका केली होती. मात्र अभयने फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारणाऱ्या काही कलाकारांचं कौतुकही केलं होतं. त्यापैकीच एक असलेला बॉलिवूडचा चॉकलेट हिरो रणबीर कपूरने फेअरनेस क्रीमची जाहिरात पुन्हा नाकारली आहे.


बॉलिवूडमधील आठ-दहा कलाकारांचे फोटो फेसबुकवर पोस्ट करुन अभय देओलने सणसणीत चपराक लगावली होती. अभयच्या पोस्टला सोनम कपूरचा अपवाद वगळता कोणीच उत्तर दिलं नव्हतं. आता रणबीर कपूरने फेअरनेस क्रीमची 9 कोटींची जाहिरात नाकारल्याचं वृत्त 'स्पॉटबॉय' या वेबसाईटने दिलं आहे. अभयपाठोपाठ रणबीरचं कृत्य इतरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं ठरणार आहे.

फेअरनेस क्रीमचा विरोध, अभयचा शाहरुख, दीपिका, विद्यावर निशाणा


2011 मध्येही रणबीर कपूरने फेअरनेस क्रीमची जाहिरात करण्यास नकार दिला होता. अशी उत्पादन वर्णद्वेषाला प्रोत्साहन देत असल्याचं मत रणबीर कपूरने व्यक्त केलं होतं. अभिनेत्री कंगना रनौत, अनुष्का शर्मा यांनीही अशाचप्रकारे गोरेपणाचं आश्वासन देणाऱ्या क्रीमची जाहिरात नाकारली होती.

गोऱ्या रंगाचं अवडंबर, फेअरनेस क्रीमची जाहिरात नाही करणार, अनुष्काचा कौतुकास्पद निर्णय


शाहरुख खान, दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, विद्या बालन, जॉन अब्राहम, एलियाना डिक्रुझ, सोनम कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, नंदिता दास यासारख्या डझनभर कलाकारांच्या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींचे फोटो अभय देओलने फेसबुकवर पोस्ट केले होते. प्रत्येक पोस्टमध्ये एखादी टिपण्णी लिहून अभय देओलने वर्णभेदाचा विरोध केला होता.

फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीआड काळा-गोरा असा वर्णभेद निर्माण केला जातो. ब्रँड अॅम्बेसेडर असणारे कलाकार जाहिरातीतून त्वचा उजळ करण्याचा पोकळ दावा करतात. यामुळे केवळ वर्णभेदाला खतपाणी मिळतं. म्हणून चित्रपट कलाकारांनी त्यात पडू नये, असा सल्ला त्याने दिला होता.

म्हणून कंगनाने दोन वर्षांपूर्वी नाकारली होती 2 कोटींची जाहिरात!


वर्णभेदाचा ठाम विरोध करणारी अभिनेत्री नंदिता दास, बंडखोर अभिनेत्री कंगना रनौत, हरहुन्नरी अभिनेता रणदीप हुडा, चॉकलेट हिरो रणबीर कपूर, अभिनेत्री स्वरा भास्कर यांचं अभयने कौतुक केलं होतं.