Ranbir Kapoor and Alia Bhatt Daughter: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी त्यांची मुलगी राहाचा चेहरा पहिल्यांदा पापाराझीसमोर रिव्हिल केला आहे. आलिया आणि रणबीर हे सोमवारी ख्रिसमस लंच प्रोग्रॅमसाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत राहा देखील होती. आलिया आणि रणबीर यांनी राहासोबत पापाराझीला फोटोसाठी पोज दिल्या. 


ख्रिसमस लंच प्रोग्रॅमसाठी कपूर कुटुंबानं खास लूक केला होता. यावेळी राहा ही व्हाईट फ्रॉक, दोन पोनी टेल आणि रेड शूज अशा क्युट लूकमध्ये दिसली. राहाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


आलिया आणि रणबीर यांनी त्यांच्या मुलीचा चेहरा पहिल्यांदा पापाराझीसमोर रिव्हिल केला आहे. राहाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "राहा खूपच क्यूट दिसते"तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "राहाचे डोळे खूपच सुंदर आहेत. राहा तिच्या आईसारखीच क्यूट आहे." सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रणबीरनं राहाला उचललं आहे, असं  दिसत आहे. 


पाहा व्हिडीओ:






राहाचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला. आलिया ही अनेकवेळा राहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. पण या फोटोंमध्ये राहाचा चेहरा रिव्हिल करण्यात आला नव्हता. आता रणबीर आणि आलिया यांनी राहाचा चेहरा रिव्हिल केला आहे.


काही दिवसांपूर्वी राहाचा पहिला वाढदिवस रणबीर आणि आलियानं साजरा केला. राहाच्या पहिल्या बर्थ-डेच्या सेलिब्रेशनचे फोटो आलियानं सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं,  "आमचा आनंद, आमचं आयुष्य आणि आमच्या जीवनातील प्रकाश, तू माझ्या पोटात लाथा मारत आहेस, हे  परवा घडलं असं मला वाटत आहे. माझ्याकडे भावना मांडण्यासाठी शब्द नाहीत पण तू आमच्या आयुष्यात आहेस, हे आमचं भाग्य आहे. तू आम्हाला एका चविष्ट केकच्या तुकड्याप्रमाणे वाटत आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबी टायगर, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो."
 


इतर महत्वाच्या बातम्या:


Raha Birthday Celebration: केक, चविष्ट पदार्थ आणि खास डेकोरेशन; दणक्यात पार पडला आलिया आणि रणबीरच्या लेकीचा वाढदिवस