Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding Postpone: बॉलिवूडची सर्वाधिक लोकप्रिय रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) जोडीबाबत गेले अनेक दिवस चर्चा होत आहेत. आलिया आणि रणबीर येत्या डिसेंबर महिन्यात विवाह बंधनात अडकण्याची शक्यता आहे, अशा चर्चादेखील होत्या. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नासाठी आतुर झाले आहेत. पण आता ते दोघे पुढल्या वर्षात एप्रिल महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कतरिना आणि विकी कौशलसोबत आलिया आणि रणबीरदेखील डिसेंबर महिन्यात लग्न करतील म्हणून चाहतेदेखील खूश होते. पण आता चाहत्यांना पुढल्या वर्षीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
पुढल्या वर्षात एप्रिलमध्ये विवाहबंधनात अडकणार रणबीर-आलिया
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नुकतेच दिवाळीच्या मुहुर्तावर पूजा करताना स्पॉट झाले होते. त्यांच्यासोबत ब्रम्हास्त्र सिनेमाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीदेखील उपस्थित होते. पूजेदरम्यानचे रणबीर आणि आलियाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. आलिया आणि रणबीरचे लग्न पुढल्या वर्षात एप्रिलमध्ये होऊ शकतं, अशी आशा वर्तवली जात आहे. अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
रणबीर आणि आलियाच्या लग्नाबाबत रणबीर मागे एका मुलाखतीत म्हणाला होता, कोरोना नसता तर मी आलियासोबत कधीच लग्न केले असते. सिनेमाच्या शूटिंगच्या तारखा आधीच ठरल्या असल्याने लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे, असे म्हटले जाते. आलियाचे 'गंगूबाई काठियावाडी', 'आरआरआर', 'डार्लिंग्स' आणि 'रॉकी और राणी की प्रेम कहानी' हे आगामी सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. रणबीरच्यादेखील काही सिनेमांचे शूटिंग सुरू आहे. त्यामुळे दोघांनी आधी काम आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंगना रनौतला दंडाधिकारी कोर्टाचा मोठा दिलासा, कंगना आणि तिच्या बहिणीविरोधातील याचिका अंधेरी कोर्टानं फेटाळली
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार अशा चर्चा मागील काही दिवसांपासून रंगलेल्या होत्या. त्यानंतर आलियाच्या आईने एका कार्यक्रमात यावर स्पष्टीकरण दिले होते. लग्नासंदर्भात 'सोनी राजदान' म्हणाल्या, "आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नासाठी मी देखील उत्सुक आहे. पण त्याला बराच वेळ आहे. भविष्यात दोघांचे लग्न होणारच आहे. पण अजून लग्नाची तारीख ठरलेली नाही".