Ajay Devgn Drishyam 2 : बॉलिवूड अभिनेता सुपरस्टार अजय देवगनच्या (Ajay Devgn) बहुचर्चित 'दृश्यम 2' (Drishyam 2) सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर निर्मात्यांनी आता दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. नुकतेच या सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 


अजयने चाहत्यांना टाकलं कोड्यात 


हिंदी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत अजय देवगनचे नाव घेतले जाते. अजयचा 'दृश्यम' हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील कामासाठी अजयचे प्रचंड कौतुक झाले होते. आता पुन्हा एकदा 'दृश्यम 2'च्या माध्यमातून सिनेमागृहात धुमाकूळ घालण्यासाठी अजय सज्ज आहे. अजयने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर 'दृश्यम 2'चे पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत अजयने कॅप्शन लिहिलं आहे, तुमच्या डोळ्यासमोर काय आहे? हा प्रश्न नाही आहे. तर तुम्ही काय पाहताय हा प्रश्न आहे." अजयने हा प्रश्न विचारत चाहत्यांना कोड्यात टाकलं आहे. 






'दृश्यम 2' कधी होणार प्रदर्शित?


'दृश्यम 2'चं नवं पोस्टर रिलीज होण्याआधी या सिनेमाचा कमाल टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. टीझर आऊट करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. अजय देवगन स्टारर 'दृश्यम 2' हा सिनेमा पुढील महिन्यात 18 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तर 17 ऑक्टोबरला (उद्या) या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'दृश्यम 2'मध्ये अजयसह तब्बू, श्रेया सरन आणि इशिता दत्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात तब्बू एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. हा सिनेमा ''दृश्यम 2' या मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. अभिषेत पाठक या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे.  


'दृश्यम' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन सात वर्ष झाली आहे. तब्बल सात वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2015 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याआधी 'दृश्यम 2'च्या सेटवरील एक फोटो शेअर करत अजयने लिहिलं होतं,विजय पुन्हा एकदा त्याच्या कुटुंबाचे रक्षण करू शकेल का?". 


संबंधित बातम्या


Drishyam 2 Released Date : अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’च्या रिलीजचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Drishyam 2 First Look : अजय देवगनच्या 'दृश्यम 2'ची प्रतीक्षा संपली; फर्स्ट लुक आऊट