Me Ani Dr Kashinath Ghanekar : 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' (Ani Dr Kashinath Ghanekar) हा सिनेमा गेल्या काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. अशातच रमेश भिडे (Ramesh Bhide) लिखीत 'मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' (Me Ani Dr Kashinath Ghanekar) हे पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. दादरच्या रविंद्र नाट्यमंदिरात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे. 


'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या सिनेमात डॉक्टरांच्या आयुष्यातील काळी बाजूच जास्त प्रमाणात दाखवण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला खरे डॉक्टर कळावेत या पोटतिडकीतून या नाटकाचा आणि पुस्तकाचा जन्म झाला आहे. ही गोष्ट रमेश भिडे यांना बोचत होती. त्यामुळेच त्यांनी 'मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' हे पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला. या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ. काशिनाथ घाणेकर खऱ्या अर्थाने तरुणांपर्यंत पोहोचतील. 


मराठी रंगभूमीवरील एका कालखंडावर भाष्य करणारं 'मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या पुस्तकाचं कथानक काय? 


'मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' यातला मी वाचकांसोबत संवाद साधणारा आहे. या पुस्तकाचं कथानक वाचकांना त्या काळात घेऊन जाणारं आहे. त्यामुळे रूढार्थाने लेखक नसतानादेखील वाचक रमेश भिडे यांच्या लेखनात गुंतत जातो. हे पुस्तक मराठी रंगभूमीवरील एका कालखंडावर भाष्य करणारं आहे. 



ज्येष्ठ रंगकर्मी आणि कादंबरीकार नारायण जाधव यांच्या हस्ते 'मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. प्रकाशन सोहळ्यादरम्यान ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार, नेपथ्यकार सुनील देवळेकर, हेमंत भालेकर, ज्येष्ठ पत्रकार रविप्रकाश कुळकर्णी, दिलीप हरळीकर, प्रभाकर पणशीकर यांच्या कन्या रंगिणी खोत आणि जान्हवी पणशीकर आणि व्यवस्थापक गोट्या सावंत हे मान्यवर उपस्थित होते. मखमली पडदा उघडुन या पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रकाशित केले गेले. 


संबंधित बातम्या


Niravadhi : महेश मांजरेकरांनी केली 'निरवधी' सिनेमाची घोषणा; सुबोध भावे मुख्य भूमिकेत


Aapdi Thaapdi Teaser : 'आपडी-थापडी'चा टीजर लाँच, श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत, चित्रपट दसऱ्याला प्रेक्षकांच्या भेटीला