Tunisha Sharma: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला. तुनिषा 'अलिबाबा दास्तान ए काबुल' या मालिकेत मुख्य भूमिकेत होती. तुनिषानं 24 डिसेंबरला मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. नुकतीच केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी तुनिषाच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी तुनिषाच्या आईनं रामदास आठवले यांच्याकडे 'शिझान खानला कठोर शिक्षा द्या.', अशी मागणी केली.
तुनिषाच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी सांगितलं, 'आम्ही तुनिषाच्या आईला भेटलो. त्यांनी आरोपी शिझान खानला कठोर शिक्षेची मागणी केली. त्यांची मागणी पूर्ण होईल,असं आश्वासन आम्ही त्यांना दिलं आहे. मी उपमुख्यमंत्र्यांना भेटेन. शिझाननं तुनिषाचा विश्वासघात केला आणि त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, त्याला फाशी द्या.'
अभिनेत्री तुनिषा शर्मा गेल्या काही दिवसांपासून शिझान खानसोबत रिलेशनमध्ये होती आणि आत्महत्येच्या 15 दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला, असं म्हटलं जात आहे शिझानने तुनिषासोबतचं नातं संपवल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यामुळेच तिने आत्महत्येचा पर्याय निवडला, असं देखील म्हटलं जात आहे. सध्या शिझान हा पोलीस कोठडीत आहे. 30 डिसेंबरपर्यंत शिझानला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिझानला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी तुनिषाचे कुटुंबिय करत आहेत.
तुनिषा शर्माने 'भारत का वीर पुत्तर : महाराणा प्रताप' , 'इंटरनेट वाला लव' , 'अलीबाबा : दास्ताने ए कुबुल' आणि 'इश्क सुभान अल्लाह' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Tunisha Sharma: 'ती आत्महत्या करुच शकत नाही'; तुनिषा शर्माच्या मामानं व्यक्त केल्या भावना