Ramayana The Introduction : भारतीय पौराणिक इतिहासावर आधारित आणि जागतिक पातळीवर भव्यतेचा नवा उच्चांक गाठणाऱ्या 'रामायण: द इंट्रोडक्शन' या सिनेमाचा पहिला अधिकृत लूक 3 जुलै 2025 रोजी देशातील 9 प्रमुख शहरांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. नमित मल्होत्रा यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला हा चित्रपट मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, कोलकाता आणि कोची या शहरांमध्ये भव्य लोकार्पण सोहळ्याद्वारे प्रेक्षकांसमोर आणला जाणार आहे.

Continues below advertisement


भारतीय महाकाव्याचे जागतिकरूपात सादरीकरण


'रामायण: द इंट्रोडक्शन' हा चित्रपट केवळ पौराणिक कथा सांगणारा चित्रपट नसून, तो भारतीय सांस्कृतिक वारशाला आधुनिक सिने-तंत्रज्ञानाच्या साह्याने नव्या पिढीपुढे मांडण्याचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी नितेश तिवारी यांच्याकडे असून, हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग दिवाळी 2026 साली तर दुसरा भाग दिवाळी 2027 साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


जगातील सर्वात भव्य सिनेमांपैकी एक


या भव्य सिनेमामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कलाकार, उच्च दर्जाचा CGI-VFX वापर, आणि कलात्मक-तांत्रिक सर्जनशीलतेचा संगम पहायला मिळणार आहे.


Prime Focus Studios, 8 वेळा ऑस्कर विजेते VFX स्टुडिओ DNEG, आणि अभिनेता यश यांच्या Monster Mind Creations यांच्यातील सहकार्यामुळे हा प्रकल्प फक्त भारतापुरताच मर्यादित राहणार नाही, तर तो जगभरात भारतीय महाकाव्याचे दर्शन घडवणारा सिनेमा ठरणार आहे.


जागतिक दर्जाची सादरीकरण


रामायण हे जगातील सर्वात प्राचीन आणि पवित्र महाकाव्यांपैकी एक असून, यामध्ये नीतिमूल्यं, धर्म, आणि मानवी जीवनातील आदर्श दाखवले गेले आहेत. या कथेला नव्या दृष्टिकोनातून, अत्याधुनिक सिने-तंत्रज्ञानाच्या मदतीने सादर करत 'रामायण: द इंट्रोडक्शन' प्रेक्षकांमध्ये नवीन उर्जा आणि उत्साह निर्माण करणार आहे.


ही बातमी वाचा :