Ranbir Kapoor Ramayana Plot Revealed : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) आगामी 'रामायण' (Ramayana) हा सिनेमा काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. एक नव्हे तर तीन भागांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. रिलीजआधी या सिनेमाचा फ्लॉट लीक झाला आहे.
नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित 'रामायण' हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमासंदर्भात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि सनी देओलसह (Sunny Deol) अनेक दाक्षिणात्य कलाकार झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता या सिनेमाच्या कथानकासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे.
'रामायण'मध्ये काय पाहायला मिळणार? (Ramayana Movie Details)
रणबीरचा 'रामायण' हा सिनेमा रिलीजआधीपासून चर्चेत आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, नितेश तिवारीचा 'रामायण' हा सिनेमा तीन भागांमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात प्रभू रामाचं बालपण ते वनवास, सीतेचे हरण अशा अनेक गोष्टी दाखवण्यात येणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, 'रामायण'च्या दुसऱ्या भागात प्रभू राम आणि लक्ष्मण यांची भेट दाखवण्यात येणार आहे. हनुमान, वानर सेना, रामसेतू अशा अनेक गोष्टी दुसऱ्या भागात उलगडण्यात येणार आहेत. तिसऱ्या भागात वानर सेना आणि रावण सेना यांच्यातील युद्ध दाखवण्यात येईल. कथानक समोर आल्याने प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
बॉबी देओल-सनी देओल एकत्र झळकणार
नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात रणबीर प्रभू रामाच्या भूमिकेत आहे. तर सीताची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमात सनी देओल (Sunny Deol) हनुमानाची भूमिका साकारणार आहे. तसेच बॉबी देओलदेखील (Bobby Deol) या सिनेमाचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. 'रामायण' सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनचं काम सध्या सुरू आहे. 17 एप्रिल 2024 रोजी या सिनेमासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येईल असे म्हटले जात आहे.
लंडनमध्ये होणार शूटिंग
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूर आणि नितेश तिवारी लवकरच रामायणच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. मुंबईत 60 दिवस या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. त्यानंतर पुढील शूटिंग लंडनमध्ये होणार आहे. या बहुचर्चित सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
संबंधित बातम्या