Ramayana Release Day Update : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांचा 'रामायण' (Ramayana) हा चित्रपट बॉलिवूडच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित या चित्रपटाचे अनेक मोठ-मोठे अपडेट्स समोर येत आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या सेटवरचे फोटो लीक झाले आहेत. त्यानंतर रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचा लूकही रिवील झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. रामायणच्या असंख्य अपडेट्सनंतर चाहते आता या चित्रपटाच्या रिलीज डेटची प्रतीक्षा करत आहेत. प्रत्येकाला या चित्रपटाची रिलीज डेट जाणून घ्यायची आहे. अशातच आता या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल नवी अपडेट समोर आली आहे. 


'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघांच्या फर्स्ट लूकचे फोटो लीक झाले आहेत. रणबीर कपूरचा हा चित्रपट वेगवेगळ्या भागांमध्ये रिलीज होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. नितेश तिवारीच्या अनोख्या अंदाजात प्रेक्षकांना रामायण चित्रपट पाहता येणार आहे. चाहते 2024 च्या शेवटी किंवा 2025 च्या सुरुवातीला 'रामायण' चित्रपट रिलीज होणार असल्याची शक्यता वर्तवत आहेत. 


'रामायण' 2027 मध्ये होणार प्रदर्शित?


बॉक्स ऑफिस ट्रेड एनालिस्ट सुमित काडेलच्या अनुसार, रामायण चित्रपटासाठी प्रेक्षकांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. रणबीर आणि साई पल्लीवाचा चित्रपट निर्माते ऑक्टोबर 2027 मध्ये रिलीज करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे आता या चित्रपटासाठी प्रेक्षकांना तीन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या या चित्रपटात केजीएफ फेम यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.


बॉलिवूडचा सर्वात महागडा चित्रपट 'रामायण' 


नितेश तिवारी यांना रामायण चित्रपटात काहीही कमी नको आहे. त्यामुळे या चित्रपटावर त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. रामायण भारतातील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या बजेटमध्ये आठवेळा केजीएफसारख्या चित्रपटांची निर्मिती होऊ शकते. बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार, रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी 835 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तगडी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट खूपच भव्यदिव्य असणार आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 


संबंधित बातम्या


Ramayana Movie update : रणबीर कपूरचा रामायण वादाच्या भोवऱ्यात, कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता; नेमकं प्रकरण काय?