Ram Setu Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या राम सेतू (Ram Setu) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. 'राम सेतू को बचाने के लिए हमार पास सिर्फ तीन दिन है' या टीझरमधील अक्षयच्या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटामध्ये अक्षयसोबतच नुसरत भरुचा (Nushratt Bharuccha), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि सत्यदेव कंचरण या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
राम सेतू या चित्रपटाचं शूटिंग उटी, दमण- दीव आणि मुंबईच्या जवळ झाले आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. केप ऑफ गुड होप, अॅमेझॉन प्राइम, एबंडंटिया एंटरटेनमेंट आणि लायका प्रॉडक्शन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 25 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पाहा टीझर :
अक्षयची पोस्ट
अक्षय कुमारनं देखील हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला त्यानं कॅप्शन दिलं, 'राम सेतूची पहिली झलक फक्त तुमच्यासाठी, आम्ही हे खूप प्रेमानं तयार केलं आहे. तुम्हाला टीझर आवडला की नाही हे आम्हाला नक्की सांगा. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.' प्रेक्षक अक्षयच्या या आगमी चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. चित्रपटात आर्केलॉजिस्ट आर्यन कुलश्रेष्ठ हे भूमिका अक्षय साकारणार आहे.
अक्षयचे आगामी चित्रपट
राम सेतू व्यतिरिक्त अक्षय कुमारचे अनेक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'मिशन सिंड्रेला', ‘ओएमजी 2’ , ‘सेल्फी’ , गोरखा हे अक्षयचे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘ओएमजी 2’ या चित्रपटात अक्षयसोबतच यामी गौतम, पंकज त्रिपाठी आणि अरुण गोविल हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या काही दिवसांपूर्वी त्याचे 'रक्षाबंधन', ' सम्राट पृथ्वीराज', कटपुतली हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Ram Setu : प्रदर्शनाआधीच ‘रामसेतू’ मोठ्या वादात, सुब्रमण्यम स्वामींकडून अक्षय कुमारसह 8 जणांना कायदेशीर नोटीस!
- Ram Setu : अक्षय कुमारचा 'राम सेतु' फक्त सिनेमागृहात होणार रिलीज; निर्मात्यांची माहिती