'न्यूक्लिअर' असे या सिनेमाचे नाव असून, मेगाबजेट असा हा सिनेमा आहे. केवळ बॉलिवूडपुरता मर्यादित नसून, आंतरराष्ट्रीय सिनेमांच्या तोडीस तोड असा हा सिनेमा असेल, असे राम गोपाल वर्मा यांचे मत आहे.
तब्बल 340 कोटी रुपये बजेटच्या या सिनेमाची शूटिंग 12 हून अधिक देशात होणार आहे. त्यामुळे शूटिंग लोकेशन आणि बजेटच्या दृष्टीने भारतीय सिनेमाच्या इतिहासातही हा सिनेमा वेगळा ठरेल, यात शंका नाही.
'द बिगिनिंग ऑफ वर्ल्ड वॉर 3' अशी या सिनेमाची पंचलाईन आहे. काश्मीरचा प्रश्न अणुयुद्धाला कसं आमंत्रण देतो, यावर या सिनेमाचं कथानक बेतलं आहे. भारत-पाकिस्तानच्या दृष्टीने काश्मीरचा प्रश्न कायमच महत्त्वाचा मानला गेला आहे. त्यामुळे या सिनेमात राम गोपाल वर्मा नक्की काय मांडतो आहे, याचीही अनेकांना उत्सुकता लागली आहे.