Ram Charan Wife Upasana Kamineni Net Worth :  बॉलिवूड ते  टॉलिवूडपासून  भारतीय सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींच्या पत्नी आपला स्वतंत्र व्यवसाय करतात. या सेलिब्रिटींच्या पत्नींनी आपल्या व्यवसायात स्वतंत्र ठसा उमटवला आहे. कोणी फॅशन इंडस्ट्रीमध्ये असून कोणी इंटिरियर डिझायनर आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणची (Ram Charan) पत्नी उपासना कामिनेनीदेखील (Upasana Kamineni) एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. उपासना एक मोठं बिझनेस एम्पायर सांभाळत आहे. 


अभिनेता राम चरणने आरआरआर, मगधीरा, रंगस्थलम सारख्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. राम चरण हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीतील अभिनेत्यांपैकी एक आहे. राम चरण हा श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र, राम चरणची पत्नी उपासना ही एक मोठा व्यवसाय सांभाळत आहे. उपासनाने लंडनमधील रिगेंट्स विद्यापीठ आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले. 


 77 हजार कोटींचा साम्राज्य सांभाळतेय उपासना 


उपासना ही भारतातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट कुटुंबातील एक वारसांपैकी एक आहे.  उपासना सुमारे 77,000 कोटी रुपयांचे मोठे व्यावसायिक साम्राज्य हाताळत आहे. उपासना ही अपोलो हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. प्रताप सी. रेड्डी यांची नात आहे. उपासना ही चेन्नईस्थित विशाल हेल्थकेअर फॅसिलिटीचा संपूर्ण व्यवसाय हाताळत आहे. तिची आई शोभना याही या देखील कंपनीचा व्यवसाय सांभाळत आहे. 






अपोलो हॉस्पिटलच्या CSR विभागाची उपाध्यक्ष


उपासना ही अपोलो हॉस्पिटलच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) विभागाची उपाध्यक्ष आहे.  तर, FHPL ची व्यवस्थापकीय संचालक आहे. UR.Life नावाचा वेलनेस प्लॅटफॉर्म लाँच करण्यात उपासनाने खास भूमिका बजावली आहे. त्याशिवाय, उपासनाच्या वडिलांनी  KEI Group लाँच केला होता.


उपासना आणि राम चरणची संपत्ती किती?






उपासना आणि राम चरण यांची एकूण संपत्ती सुमारे 2500 कोटींच्या घरात आहे. एका वृत्तानुसार, राम चरण 1370 कोटी रुपयांचे मालक आहेत, तर उपासनाची एकूण संपत्ती 1130 कोटी रुपयांच्या घरात आहे. दोघेही अतिशय लक्झरी लाईफ जगतात. त्यांच्या घराची किंमत सुमारे 30 कोटी रुपये आहे. दोघांचेही स्वतःचे खाजगी जेट आहे. त्यांच्याकडे मर्सिडीज मेबॅक, रोल्स रॉयस सारख्या कार आहेत.