Health Updates of Raju Srivastava : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमधील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.  राजू श्रीवास्तव यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन  नुकातीच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा श्रीवास्तवनं राजू यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. 


अंतरा श्रीवास्तवनं राजू श्रीवास्तव यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील पोस्टमध्ये लिहिले, 'प्रिय हितचिंतक माझे वडील राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे. ते हळूहळू बरे होत आहेत. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. AIIMS दिल्ली आणि राजू श्रीवास्तव यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरील विधानांवर विश्वास ठेवा. इतर कोणाच्या वक्तव्यावर आणि बातम्यांवर विश्वास ठेवू नका. एम्स दिल्ली येथील डॉक्टर आणि त्यांची टीम राजू श्रीवास्तव यांची प्रकृती ठिक होण्यासाठी मेहनत घेत आहेत. आम्ही त्यांचे आभार मानतो. मी सर्वांना विनंती करते की तुमचे प्रेम आणि प्रार्थना सुरु ठेवा.'


पाहा पोस्ट: 






जिममध्ये व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालावली होती. राजू श्रीवास्तव जिममध्ये कसरत करत होते, तिथे ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले. त्यावेळी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हापासून राजू श्रीवास्तव बेशुद्ध होते. त्यांना व्हेंटिलेटरवर  ठेवण्यात आले होते. दरम्यान राजू यांची अँजिओग्राफी देखील करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांच्या हृदयात 100% ब्लॉकेज असल्याचे आढळले होते. 


मैंने प्यार किया आणि बाजीगर या चित्रपटांमध्ये राजू श्रीवास्तव यांनी काम केलं. तसेच 'बिग बॉस 3', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला आणि विनोदांना प्रेक्षकांची पसंती मिळते. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील राजू अॅक्टिव्ह असतात. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Liger Box Office collection : साऊथ बॉक्स ऑफिसवर दिसली विजय देवरकोंडाची जादू, ‘लायगर’ची पहिल्या दिवशी चांगली कमाई!