Raju Srivastava Health Update : विनोदवीर राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांचा भाऊ दीपू श्रीवास्तवने एबीपी न्यूजला दिली आहे. 


दीपू श्रीवास्तव म्हणाले, राजू यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. राजूच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करावी".


राजू श्रीवास्तव यांच्या जवळचा मित्र सुनील पालने नुकतचं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे,"राजू श्रीवास्तव यांचे व्हेंटीलेटर काढण्यात येणार आहे". आता यावर स्पष्टीकरण देत राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतराने एबीपी न्यूजला माहिती दिली आहे की,"राजू श्रीवास्तव यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर होत असलेल्या माहितीवर लक्ष ठेवा. अफवांवर लक्ष ठेऊ नका". 


प्रकृतीत सुधारणा


राजू श्रीवास्तव दिल्लीतील एका हॉटेलमध्ये ट्रेडमिलवर व्यायाम करत होते. पण अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि जमिनीवर कोसळले. त्यानंतर लगेचच राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजू अजूनही व्हेंटिलेटरवर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. 


'मैंने प्यार किया' आणि 'बाजीगर' या सिनेमांत राजू श्रीवास्तव यांनी काम केलं आहे. तसेच  'बिग बॉस 3', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळते. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील राजू अॅक्टिव्ह असतात. 


संबंधित बातम्या


Raju Srivastava : सेल्फीसाठी काहीही! राजू श्रीवास्तव यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी थेट आयसीयूत घुसला चाहता


राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अद्याप जैसे थे, 13व्या दिवशीही कॉमेडियन बेशुद्धच!