Vikram Vedha Teaser : अभिनेता हृतिक रोशन मोठ्या ब्रेकनंतर ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) अभिनित ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अ‍ॅक्शन पॅक्ड व्हिज्युअल्स आणि आशयघन कथानक असलेला 'विक्रम वेधा' या हिंदी चित्रपटाचा टीझर म्हणजे प्रेक्षकांसाठी एक आश्चर्याचा सुखद धक्काच आहे. या चित्रपटात ‘वेधा’च्या भूमिकेत अभिनेता हृतिक रोशन झळकणार आहे, तर सैफ अली खान ‘विक्रम’ साकारत आहे.


चित्रपटाचा 1 मिनिट 46 सेकंदांचा टीझर 'विक्रम वेधा'च्या विश्वाची सफर घडवणारा आहे. शिट्ट्या वाजवण्याजोगे संवाद, मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्शन सीक्वेन्स, आकर्षक पार्श्वसंगीत आणि भावूक करणाऱ्या नाट्याने हा टीझर परिपूर्ण आहे. 'विक्रम वेधा' हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे एक पूर्ण पॅकेज असल्याचे संकेत देणारा टीझर खूपच आकर्षक आहे.


पाहा टीझर :



अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्यासमवेत दिग्दर्शक पुष्कर-गायत्री यांच्या या चित्रपटाच्या टीझरला डिजिटल प्लॅटफॉर्मवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कौतुकाचा वर्षाव होत आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना हा चित्रपट पहायला मिळणार आहे.


काय आहे कथानक?


'विक्रम वेधा' या अ‍ॅक्शन-थ्रिलरचे लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केले आहे. 'विक्रम वेधा'चे कथानक नाट्यमय वळणांनी भरलेले आहे. कडक शिस्तीचा पोलिस अधिकारी विक्रम (सैफ अली खान) गँगस्टर वेधाला (हृतिक रोशन) पकडतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने चोर पोलिसांचा पाठ शिवणीचा खेळ सुरू होतो. वेधा आपली कथा सांगत असताना विविध पैलू उलगडत जातात आणि विक्रमला वास्तवतेचे दर्शन घडते.


साऊथ चित्रपटाने मिळवली प्रेक्षकांची पसंती


‘विक्रम वेधा’ या साऊथ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)आणि ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विक्रम वेधा चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनमध्ये ‘विक्रम’ ही भूमिका आर. माधवननं साकारली होती, तर ‘वेधा’ ही भूमिका अभिनेता विजय सेतुपतीनं (Vijay Sethupathi) साकारली होती.


गुलशन कुमार, टी-सिरीज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॅाट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने 'विक्रम वेधा' हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी 'विक्रम वेधा' हा चित्रपट संपूर्ण जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :


Hrithik Roshan : ह्रतिकचा 'विक्रम वेधा' मधील लूक; फोटो पाहून सबा म्हणाली..


Vikram Vedha : सैफ अली खानचा 'विक्रम वेधा' मधील लूक रिलीज ; करिना म्हणाली...