Raju Srivastav : आपल्या उत्कृष्ट विनोदबुद्धीच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांची आज जयंती आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांत आणि कार्यक्रमांत काम केलं आहे. 


राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी उत्तरप्रदेशातील कानपूरात झाला. त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हेदेखील लोकप्रिय कवी होते. राजू यांना बालपणीच मिमिक्रीची गोडी लागली. शाळेत असताना ते शिक्षकांची, खोडकर विद्यार्थ्यांची तसेच त्यावेळच्या सेलिब्रिटींची मिमिक्री करत असे. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी याच क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी मुंबई गाठली. 


मुंबईत आल्यानंतर राजू श्रीवास्तव पोट भरण्यासाठी रिक्षा चालवत असे. त्यावेळी ते रिक्षात बसलेल्या प्रवाशांची मिमिक्री करून त्यांचे मनोरंजन करायचे. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये ते स्टॅंडअप कॉमेड करत असे. त्यावेळी एका शोचे ते 50 रुपये मानधन घेत होते. पुढे ते जाहीर कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येऊ लागले. अशाप्रकारे मुंबईत त्यांना खूप स्ट्रगल करावा लागला. 


राजू श्रीवास्तव यांचे अनेक सिनेमे आणि कार्यक्रम चांगलेच गाजले आहेत. सलमान खानच्या 'मैने प्यार किया' या सिनेमातील त्यांच्या विनोदी अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 'बिग बॉस 3', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' अशा अनेक कार्यक्रमांत राजू सहभागी झाला होता. राजू यांना 'द किंग ऑफ कॉमेडी' असं म्हटलं जातं. त्यांच्या 'गजोधर भैय्या' या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. 


राजू श्रीवास्तव यांची फिल्मी लव्हस्टोरी (Raju Srivastav Lovestory) : 


राजू श्रीवास्तव यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. खरं प्रेम मिळवण्यासाठी राजू यांनी तब्बल 12 वर्ष वाट पाहिली. 12 वर्षांच्या संघर्षानंतर त्यांना त्यांचं खरं प्रेम मिळालं. शिखाला डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजू यांच्या संघर्षाच्या काळात त्यांच्या पत्नीने मोलाची साथ दिली होती.  


राजू श्रीवास्तव यांनी 21 सप्टेंबर 2022 रोजी अखेरचा श्वास घेतला. 10 ऑगस्टला व्यायाम करताना ते ट्रेड मिलवर कोसळले. त्यानंतर त्यांना लगेचच दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली. 


संबंधित बातम्या


Raju Srivastav : विनोदवीर राजू श्रीवास्तव यांची एक्झिट; मनोरंजसृष्टीतून शोक व्यक्त