मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाचा विरोध आता आणखी तीव्र झाला आहे. रजपूत संघटनेतर्फे संजय लीला भन्साळींच्या मुंबईतील जुहू इथल्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. 1 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
यावेळी आंदोलकांनी पद्मावती सिनेमा थांबवण्याची मागणी केली. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतलं. पद्मावती सिनेमात राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात आक्षेपार्ह चित्रण दाखवलं, राणी पद्मावतीचं चुकीचं चित्रण चित्रपटात केलं गेलं असा आंदोलकांचा आरोप आहे.
दरम्यान या सिनेमात राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात कोणताच आक्षेपार्ह सीन नसल्याचं संजय लीला भन्साळी यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र तरीही हा विरोध कमी होताना दिसत नाही. ठिकठिकणी विरोध केला जात आहे.