Rajkummar Rao And Patralekhaa First Photo After Wedding : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावचा (Rajkummar Rao)  पत्रलेखासोबत (Patralekhaa)  नुकताच चंदीगड  येथे विवाहसोहळा पार पडला. या शाही विवाह सोहळ्याचे फोटो पत्रलेखा आणि राजकुमार यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.  पत्रलेखा आणि राजकुमार  यांच्यासोबतचा फोटो नुकताच मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून  मनोहर लाल खट्टर यांनी लिहीले, 'चंदीगडमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या विवाह सोहळ्यात हजेरी लावून वर आणि वधूला त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.' मनोहर लाल खट्टर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये राजकुमार आणि पत्रलेखा रॉयल लूकमध्ये दिसत आहेत. 

पत्रलेखाने  देखील विविह सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले, 'माझ्या प्रिय व्यक्तीसोबत आज मी लग्नगाठ बांधली.माझा प्रियकर, सखा, माझ्या कुटुंबातीलच एक सदस्य...मागील अकरा वर्षांतील माझ्या सगळ्यात जवळचा मित्र. तुझी पत्नी होण्याचे भाग्य मला लाभले आहे.  '   

Patralekhaa Wedding Saree : Patralekha च्या साडीवर बंगाली भाषेत लिहिला होता 'हा' संदेश, Rajkummar Rao ने केले पत्रलेखाचे कौतुकॉ

राजकुमारच्या हम दो हमारे दो, काय पो छे, न्यूटन,  शादी में जरूर आना आणि क्विन या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.  बॉलिवूडमध्ये सध्या सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे.  विकी कौशल आणि कतरिना कैफ, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे.

Rajkumar Rao आणि Patralekha आज अडकले लग्नाच्या बेडीत, चंदीगढमध्ये पार पडला विवाहसोहळा