Reason Behind Ranbir and Katrina's Breakup : बॉलिवूडमध्ये सध्या काही कलाकारांची लगीनघाई सुरू आहे. कतरिना कैफ ( Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) तसेच रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) या जोड्यांच्या लग्नाची चर्चा सध्या सुरू आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या अफेर्सच्या आणि ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू असतात. काही वर्षांपूर्वी कतरिना आणि रणबीर हे दोघे एकमेकांना डेट करत होते. पण नंतर काही दिवसांनंतर त्या दोघांचा ब्रेक-अप झाला. जाणून घेऊयात त्यांच्या ब्रेकअपचे कारण...


रणबीर आणि कतरिनाने  ब्रेक-अप केल्याने त्यांच्या चाहत्यांना थक्का बसला होता. एका रिपोर्टनुसार, रणबीरला कतरिनासोबत लग्न करायचे होते. पण कतरिना लग्नाचा विषय नेहमी टाळत असतं. त्यामुळे रणबीर आणि कतरिनामध्ये वाद निर्माण होत होते.  कपूर परिवारामध्ये दरवर्षी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले जाते. एका  ख्रिसमस  पार्टीला कतरिनाने हजेरी लावली होती. कतरिना पार्टीला आल्याने नीतू कपूर नाराज झाल्या होत्या. कतरिना आणि रणबीरच्या नात्यामुळे नीतू नाराज असल्याने रणबीरने कतरिनासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. 




सध्या रणबीर अभिनेत्री आलिया भटला डेट करत आहे. तसेच कतरिना आणि अभिनेता विकी कौशलच्या लग्नाची चर्चा देखील सुरू आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, विक्की  आणि कतरिनाचा  डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधणार आहेत.  हा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे.  विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे. लग्नात कोण उपस्थित असणार याबद्दल मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.