miss world manushi chhillar :  मिस वर्ल्ड मानुषी  छिल्लर (manushi chhillar) सध्या तिच्या  ‘पृथ्वीराज’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.  चित्रपटात मनुषी ही 'संयोगिता' या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.  हा चित्रपट 22  जानेवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मानुषी पृथ्वीराज या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मानुषीसोबत या चित्रपटात अभिनेता अक्षयकुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिचा अभिनय पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. नुकतेच मानुषीने तिचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर कलेले आहेत. 


मानुषीने सेमी शीर पिंक साडी, मोठे इअरिंग्स आणि गजरा अशा क्लासी लूकमधील फोटो नुकतेच शोशल मीडियावर शेअर केले आहेत. मानुषीची ही पिंक साडी प्रसिद्ध डिझायनर अनीता डोंगरे यांनी डिझाइन केली आहे. या साडीतची किंमत 1,10,000 रुपये  आहे.  मानुषीच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून अनेकांनी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 






'हिंदुस्थान का शेर आ रहा है'; पृथ्वीराजचा टीझर प्रदर्शित, अक्षय कुमारचा रॉयल लूक चर्चेत


मानुषीचा जन्म हरियाणातील रोहतक जिल्ह्यात झाला होता. मानुषीचे वडिल डॉक्टर मित्रा बासु छिल्लर भारताच्या सुरक्षा अनुसंधान आणि विकास संघटनांमध्ये वैज्ञानिक भूमिकांमध्ये कार्यरत आहेत. तर तिची आई नीलम इंस्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अॅन्ड एलाइड सायन्सेस न्युरोकेमेस्ट्री विभागाची प्रमुख आहे. तिचं कुटुंब हरियाणातून दिल्लीला शिफ्ट झालं होतं. मानुषीने दिल्लीतील सेंट थॉमस शाळेमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. 2017 मध्ये मानुषीने मिस वर्ल्ड हा किताब जिंकला होता. 


Ankita Lokhande : अंकिताची लगीनघाई, बॅचलर पार्टीची तयारी सुरु; या ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा