चेन्नई: नुकतेच रिलीज झालेल्या सुल्तान, उडता पंजाबसहित इतर अनेक चित्रपटांची कॉपी चित्रपट प्रदर्शनाआधीच लीक झाल्याने त्या चित्रपटांच्या कमाईवर परिणाम झाल्याचे बोलले जात होते. याच यादीत सुपरस्टार रजनीकांतचा अपकमिंग चित्रपट 'कबाली'चाही समावेश झाल्याने अनेकांना कलेक्शनची चिंता सतावू लागली.

 

पण चाहत्यांच्या चिंतेवर फुंकर घालण्याचे काम निर्मात्यांनी केले आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची कॉपी लिक झाली नसल्याचा दावा केला आहे.

 

रजनीकांतचा 'कबाली' हा चित्रपट येत्या शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. पण रिलीज होण्याआधीच याची कॉपी लिक झाल्याने अनेकांना कलेक्शनची चिंता सतावत होती.

 

चित्रपटाशी संबंधीत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाची कॉपी लिक होणे ही फक्त अफवा असून, यासाठी चित्रपटाचे निर्माते कलईपुली एस. थानू आधिकृत स्पष्टीकरण देऊ शकतात.

 

पण रजनीकांतच्या या चित्रपटाची 30 मिनिटाची कॉपी लिक झाल्याने अनेक चाहते नाराज झाले होते.

 

पा. रंजीत यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटात राधिका आपटे, धंसिका, दिनेश, कलायरसन, ऋतविका आणि विंस्टन चाओ आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

 

'कबाली' चित्रपटात रजनीकांत एका डॉनची भूमिका साकार करीत असून, त्याने मलेशियातील तमिळ लोकांच्या समान वेतनाच्या हक्कसाठी सुरु केलेल्या अंदोलनावर या चित्रपटाची कथा अधारित आहे.

 

संबंधित बातम्या

आता रजनीकांतचा 'कबाली'ही प्रदर्शनापूर्वीच लीक !


 

चेन्नई, बंगळुरुत 'कबाली'साठी कंपन्यांकडून सुट्टी जाहीर !