नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चित्रपटासाठी पार्श्वगायन करत आहेत. 'विश्वविधात श्रीपाद श्रीवल्लभ' या चित्रपटामध्ये त्यांच्या आवाजातील गाणं ऐकायला मिळणार आहे.


 
यापूर्वी मिसेस मुख्यमंत्रींनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्यावर आधारित 'संघर्षयात्रा' या चित्रपटात पार्श्वगायन केलं होतं. मात्र तो अद्याप प्रदर्शित होऊ शकलेला नाही. त्याचप्रमाणे 'जय गंगाजल' या प्रकाश झा यांच्या चित्रपटातही त्यांचा गाता गळा ऐकायला मिळाला होता.

 
विश्वविधात श्रीपाद श्रीवल्लभ हा सिनेमा दत्तगुरु यांचा कलियुगातील पहिला अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यावर आधारित आ. या चित्रपटाची निर्मिती 'के पवार फिल्म्स' करणार आहे. तर लेखन, दिग्दर्शनाची धुरा कैलास पवार यांच्या खांद्यावर असेल.