Amitabh Bachchan And Rajinikanth: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. दोघांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आता लवकरच रजनीकांत आणि अमिताभ बच्चन हे एका आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 33 वर्षानंतर अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे स्क्रिन शेअर करणार आहेत. नुकताच रजनीकांत यांनी एक खास फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिग बी आणि रजनीकांत दिसत आहे. या फोटोला रजनीकांत यांनी खास कॅप्शन देखील दिलं आहे. 


रजनीकांत यांनी शेअर केला फोटो


अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन रजनीकांत यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "33 वर्षांनंतर, मी माझे मार्गदर्शक श्री अमिताभ बच्चन यांच्यासोबत टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित आगामी थलाइवर 170  मध्ये काम करत आहे. माझे हृदय आनंदाने धडधडत आहे!" 






रजनीकांत आणि बिग बींनी 'हम' चित्रपटात केलं होतं काम


थलाइवर 170 या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी 1991 मध्ये रिलीज झालेल्या  'हम' या चित्रपटात एकत्र काम केले होते.  मुकुल आनंद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. त्यानंतर दोघांनी एकत्र काम केलं नाही. आता थलाइवर 170 या चित्रपटात 33 वर्षानंतर रजनीकांत  आणि बिग बी हे एकत्र काम करणार आहेत. 


थलाइवर 170 चित्रपटाची स्टार कास्ट


थलाइवर 170 या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासोबतच रितिका सिंह, मंजू वॉरियर आणि दुशारा विजयन हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही.


 अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांचे आणखी काही आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. रजनीकांत यांच्या  लाल सलाम या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तर अमिताभ बच्चन यांचे गणपत आणि कल्कि 2898 AD हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Amitabh Bachchan And Rajinikanth : अमिताभ बच्चन आणि रजनीकांतची जोडी पुन्हा दाखवणार आपला जलवा; 'या' सिनेमात एकत्र झळकणार