Ajinkya Movie : भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरेचा आगामी 'अजिंक्य' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. राज्यसरकारने सिनेमागृहे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे निर्मात्यांनी सिनेमा प्रदर्शित करण्याचे ठरवले.  19 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात 'अजिंक्य' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 'अजिंक्य आला रे' असं म्हणत सोशल मीडियाद्वारे सिनेमाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे. 


तरुणाईची नेमकी नस ओळखून ज्वलंत विषयावर भाष्य करणारा 'अजिंक्य' सिनेमा आहे. आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या वेगवान प्रवाहात स्वार असणाऱ्या आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा नायक आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या वेगवान प्रवाहात स्वार असणाऱ्या आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या  'अजिंक्य'च्या संघर्षावर बेतलेला हा सिनेमा आहे. अभिनेता भूषण प्रधान व अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हे दोघेही या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा या सिनेमाच्या माध्यमातून एकत्र काम करणार आहेत. त्यांच्यासोबत सिनेमात जेष्ठ अभिनेते  उदय टिकेकर, अरुण नलावडे, गणेश यादव, अनिकेत केळकर, प्रसाद जवादे, पद्मनाभ बिंब, त्रियुग मंत्री, अभिनेत्री वंदना वाकनीस आणि पल्लवी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अ. कदिर यांनी केलं आहे तसेच चित्रपटाची कथा, पटकथा, संवाददेखील अ. कदिर यांचेच आहेत. दिग्दर्शक अ. कदिर यांचा हा पहिलाच प्रयत्न असून सांगली जिल्ह्यातील जत या शहराचा तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्केटयार्ड या सर्व ठिकाणांचा त्यांनी सिनेमाच्या चित्रीकरणात उत्तम वापर करून घेतला आहे.


Tadap Teaser: सुनील शेट्टीच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; अहानच्या 'तडप' चा टीझर रिलीज


गेल्या वर्षी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला कोरोनामुळे जरी स्थगिती मिळाली असली तरी आता सगळं काही पूर्ववत झाल्यामुळे चित्रपटाचे निर्माते तसेच दिग्दर्शक प्रदर्शनासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या जाणवणारी तफावत प्रखरतेने मांडणारा चित्रपट म्हणजे 'अजिंक्य' सिनेमा होय. रोहन- रोहन या जोडीने चित्रपटाला संगीत दिले आहे. गीतकार किरण कोठावडे लिखित 'अलगद अलगद' हे गाणे रोहन प्रधान आणि मीनल जैन यांनी गायले असून सदर गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. 


भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे या दोघांना चित्रपटगृहात नव्या भूमिकेत बघणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरू शकेल. येत्या 19 नोव्हेंबर 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 


Sherlyn Chopra : Sameer Wankhede यांना शर्लिन चोप्राचा पाठिंबा


Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरातील साप्ताहिक कार्यात राक्षस आणि देवदूंतामध्ये सुरू झालं युद्ध