Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पोर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आहे. मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणामुळे अटक केली होती. त्यानंतर 21 सप्टेंबर 2021 रोजी राज कुंद्रची सुटका झाली. आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येऊन आज राजला एक वर्ष पूर्ण झाले आहे. याचनिमित्तानं राजनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं सेल्फी शेअर करुन त्याला खास कॅप्शन दिलं. या कॅप्शनमधून राजनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं. 


राजची पोस्ट 
'आर्थर रोड जेलमधून बाहेर येऊन आज एक वर्ष झालं. न्याय मिळणे ही योग्य काळाची बाब आहे. सत्य लवकरच समोर येईल! शुभचिंतकांचे आणि ट्रोल करणार्‍यांचे खूप खूप आभार, तुमच्यामुळे मला ताकद देतात.' अशी पोस्ट राजनं केली आहे. त्याचबरोबर राजनं एक सेल्फी देखील शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये राजनं हा कॅप आणि गॉगर परिधान केलेला दिसत आहे. 'पूर्ण गोष्ट माहित नसेल, तर गप्प बसा' असं या फोटोवर लिहिलेलं दिसत आहे. राजच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 






पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक झाली होती. जवळपास दोन महिने राज अटकेत होता. त्यानंतर त्याला 21 सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाला. त्यानंतर राज कुंद्राने त्याचे अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले होते. पण त्यानंतर त्यानं पुन्हा सोशल मीडियावर अकाऊंट्स अॅक्टिव्ह केले. 


‘बिग बॉस 16’ मध्ये राज कुंद्रा होणार सहभागी? 


मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस 16’ च्या निर्मात्यांनी या शोसाठी राज कुंद्राशी संपर्क साधला आहे. बिग बॉसचे निर्माते आणि राज कुंद्रा यांच्यात शोबाबत चर्चा सुरू असल्याचेही बोलले जात आहे. तर, राज कुंद्रा देखील या शोचा भाग बनण्याचा विचार करत असल्याचं समजतंय. पण अजून राज आणि बिग बॉसच्या निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 


Raj Kundra, Raj Kundra : राज कुंद्रा इंस्टाग्रामवर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह; शिल्पाला नाही तर 'या' पेजला करतो फॉलो