Raj kundra: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 2021 मध्ये मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणामुळे अटक केली होती. त्यानंतर 21 सप्टेंबर 2021 रोजी राज कुंद्रची सुटका झाली. आता राज कुंद्राच्या आयुष्यावर आधारित असणारा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या बायोपिकमध्ये राज हा स्वत:च काम करणार आहे, असंही म्हटलं जात आहे.
एका वेबसाइटच्या माहितीनुसार, सूत्रांनी सांगितले की, 'राज कुंद्राला अटक केल्यानंतर त्यानं तुरुंगात घालवलेला वेळ एका चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर दाखण्यात येणार आहे. आर्थर रोड जेलमध्ये राज कुंद्राला ज्या अडचणींचा सामना करावा लागला, त्याबद्दल चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. राज कुंद्रा या चित्रपटाच्या प्रोसेसमध्ये क्रिएटिव्ह कामासाठी जोडला जाणार आहे.
पुढे सोर्सनं सांगितलं, 'राज कुंद्राचा संपूर्ण प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांच्या रिपोर्टपासून ते मीडिया रिपोर्टिंग तसेच त्यानं तुरुंगात घालवलेला वेळ आणि घरी परत येण्यापर्यंत सर्व काही या चित्रपटात दाखवण्यात येईल. चित्रपटाची कथा कुंद्रा आणि त्याच्या कुटुंबाच्या दृष्टीकोनातून असणार आहे. या चित्रपटाबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.'
पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक झाली होती. जवळपास दोन महिने राज अटकेत होता. त्यानंतर त्याला 21 सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाला. त्यानंतर राज कुंद्राने त्याचे अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले होते. त्यानंतर त्यानं सोशल मीडियावर पुन्हा कमबॅक केला. आता राज कुंद्राच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये राजसोबतचे इतक कोणते कलाकार काम करणार? याबाबत जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी 2009 मध्ये लग्न केले होते. त्यांच्या नात्याची आणि लग्नाची खूप चर्चा झाली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :