Raj Kundra Deleted Social Media Accounts: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा एकेकाळी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव असून आता त्याने सोशल मीडियाला रामराम केला आहे. तो त्याच्या अधिकृत अकाउंटवर शिल्पासोबतचे अनेक व्हिडीओ पोस्ट करत असायचा. मात्र आता त्याने  ट्विटर आणि इंस्टाग्राम सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे राज कुंद्रा दोन महिने तुरुंगात अटकेत होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्रा कोणत्याही कार्यक्रमात दिसून आलेला नाही. शिल्पाचीदेखील अनेक कार्यक्रमांना अनुपस्थिती होती. शिल्पा एकदा अलिबागमध्ये वियान आणि शमिषा या त्यांच्या मुलांसोबत दिसून आली होती. दरम्यान राज कुंद्राने त्याचे अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले आहेत. 




राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. जगभरातील लोकांच्या प्रश्नांना राज कुंद्राला सामोरे जावे लागत होते. शर्लिन चोप्रा तर अजूनही राज कुंद्रावर आरोप करत आहे. दरम्यान शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने शर्लिन चोप्राविरोधात 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. राज कुंद्रा अश्लिल चित्रपट बनवत असल्याने 19 जुलै रोजी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. राज कुंद्रा जवळजवळ दोन महिने तुरुंगात होता. त्यानंतर त्याला सप्टेंबरमध्ये जामिन मिळाला. 


राज कुंद्राला पोलिसांनी ताब्यात कसे घेतले?
19 जुलै रोजी क्राइम ब्रान्च अधिकाऱ्यांनी कोर्टात सर्च वॉरंट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तर दुसरी टीम अंधेरीमध्ये सज्ज ठेवण्यात आली होती आणि जसं सर्च वॉरंट मिळालं तस लगेच अंधेरी मधील स्टॅण्डबाय असलेल्या क्राइम ब्रान्च टीमेने विआन कंपनीत सर्च ऑपरेशन सुरू केले.थोड्या वेळातच राज कुंद्रा सुद्धा वियान ऑफिसमध्ये पोहोचला. सर्वरमध्ये क्राईम ब्रान्चला अडल्ट डेटा आणि व्हिडीयो सापडले. राज कुंद्राने क्राईम ब्रान्चला त्याचा डेटा डिलीट करण्यास सांगितलं. जे क्राईम ब्रान्चच्या एका अधिकाऱ्याने ऐकलं. मोठ्या प्रमाणात डेटा डिलीट करण्यात आला आणि म्हणून ही बाब तिथल्या क्राइम ब्रान्चच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या वरिष्ठांना कळवली आणि वरिष्ठांच्या आदेशानंतर राज कुंद्रा सगळा डेटा डिलीट करू शकतो म्हणून त्याला आणि रायन थोर्पला 41A ची नोटीस देण्यात आली. रायन थोर्पने ती नोटीस स्वीकारली मात्र राज कुंद्रा ने नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आणि काही तासांच्या सर्च ऑपरेशननंतर प्रॉपर्टी सेलने राज कुंद्राला प्रोपर्टी सेलच्या कार्यालयात बोलावलं. राज कुंद्राने पोलिसांसोबत त्यांच्या गाडीत जाण्यास नकार दिला आणि स्वतःच्या गाडीने प्रॉपर्टी सेलचे ऑफिसमध्ये पोहोचला. क्राईम ब्रान्चकडे पुरेसे पुरावे होते. ज्या नंतर रात्री राज कुंद्राला अटक करण्यात आली.