Raj Kundra And Urfi Javed: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हे दोघेही चर्चेत असतात. राज हा त्याच्या UT 69 या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर उर्फी ही तिच्या अतरंगी फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असते. नुकताच उर्फी आणि राज यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी आणि राज या दोघांनी देखील मास्क घातलेला दिसत आहे. या दोघांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये उर्फी आणि राज हे दोघे समोरासमोर आलेले दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये उर्फी ही ब्राऊन आऊटफिट आणि गॉगल अशा लूकमध्ये दिसत आहे. उर्फीचा चेहरा या व्हिडीओमध्ये दिसत नाहीये. तसेच राज कुंद्रा हा या व्हिडीओमध्ये ब्लॅक जॅकेट आणि ब्लू जिन्स अशा लूकमध्ये दिसत आहे. राजनं चेहऱ्यावर मास्क देखील लावला आहे.


व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उर्फी आणि राज हे समोरासमोर आल्यानंतर फोटोग्राफर्स त्यांना एकत्र फोटोसाठी पोज द्यायला सांगतात. पण राज नाही म्हणतो आणि निघून जातो. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स 


उर्फी आणि राज यांच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "भाऊ-बहीण एकत्र आलेत" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "उर्फी मास्क वुमन आणि राज मास्क मॅन"






उर्फी ही तिच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असते. उर्फीच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.उर्फीनं याआधी प्लास्टिक, वायर आणि काचांपासून तयार केलेला ड्रेस परिधान करुन सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.


राज कुंद्राचा UT69 हा 3 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन राज कुंद्रानं त्याच्या UT 69 या चित्रपटाची घोषणा केली. UT 69 या चित्रपटात राज कुंद्रासोबत आणखी कोणते कलाकार काम करणार? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.  


 वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 


Raj Kundra: राज कुंद्रा बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण; "UT 69" ची केली घोषणा, चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज