Ranbir Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा  त्याच्या  'रामायण' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नितीश तिवारी यांच्या चित्रपटात रणबीर भगवान श्रीरामांची भूमिका साकारणार आहे.  या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण रिपोर्टनुसार रणबीर हा या चित्रपटामधील भूमिकेसाठी  त्याच्या जीवनशैलीमध्ये बदल करणार आहे. रणबीरनं त्याच्या काही सवयी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


रिपोर्टनुसार, रणबीर हा 'रामायण' या आगामी चित्रपटासाठी दारू पिणे सोडणार आहे. तसेच तो नॉनव्हेज खाणेही बंद करणार आहे.  रणबीर हा लेट नाईट पार्टी देखील करत नाहीये.


रणबीर हा त्याच्या पब्लिक इमेजसाठी नाही तर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी दारु आणि नॉन व्हेज खाणं बंद करत आहे, असं म्हटलं जात आहे.


रिपोर्टनुसार, रणबीर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला 'रामायण' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. रणबीर आणि साई पल्लवी फेब्रुवारी 2024 पासून शूटिंग सुरू करणार आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागात प्रभू  श्रीराम आणि सीता यांच्या कधेवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. चित्रपटाचे शूटिंग ऑगस्ट 2024 पर्यंत संपणार आहे.  KGF स्टार यश हा या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे.






रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


काही महिन्यांपूर्वी रणबीर कपूरचा 'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट रिलीज झाला. आता रणबीरच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. रणबीर कपूरने 'साँवरिया' या चित्रपटाच्या माध्यमातून 2007 मध्ये अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.  बर्फी (Barfi), रॉकस्टार (Rockstar),संजू (Sanju) , वेक अप सिड,  ये जवानी है दिवानी (Yeh Jawaani Hai Deewani) या रणबीरच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. रणबीर हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Ranbir Kapoor : रणबीरने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट; 'Animal'चा धमाकेदार टीझर आऊट!