20 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर ब्रेकअप, अभिनेता राहुल खन्ना ट्रेण्डिंग
एबीपी माझा वेब टीम | 26 Feb 2017 02:50 PM (IST)
मुंबई : प्रख्यात अभिनेते विनोद खन्ना यांचा धाकटा मुलगा, बॉलिवूड अभिनेता राहुल खन्नाचा भाऊ अशी ओळख असलेला अभिनेता राहुल खन्नानं नुकतंच ट्विटरवरुन एक गुपित उघड केलं आहे. 20 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर ब्रेकअप झाल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे. राहुल खन्नाने आपल्या ब्रेकअपची वार्ता ट्विटरवरुन जगजाहीर केली आहे. सोशल मीडियावर राहुलला प्रचंड फॅन फॉलोविंग असल्यामुळे अनेक चाहत्यांनी हळहळ व्यक्त करत त्याला काही सल्लेही दिले आहेत. अभिनय क्षेत्रात नशिब आजमावता न आल्याने त्याने ब्लॉगलेखन सुरु केलं. त्याची विनोदी लेखनशैली प्रसिद्ध असून तो आघाडीच्या अनेक मासिकांसाठी लेखनही करतो. राहुलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आतापर्यंत फारशी चर्चा झालेली नाही. तो कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे की त्याचं लग्न झालं आहे, याविषयी आतापर्यंत फारशी कोणाला खबरबात नव्हती. मात्र अचानक त्याने आपल्या दोन दशकांच्या अफेअरची अखेर झाल्याचा बॉम्ब टाकला आणि सगळेच अवाक झाले. https://twitter.com/R_Khanna/status/835446729340248064 विशेष म्हणजे राहुल खन्नाच्या चाहत्यांनी त्याला ब्रेकअपमधून सावरण्यासाठी काही टिप्सही दिल्या. चॉकलेट खाण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत अनेक सल्ले राहुलला देण्यात आले आहेत. 1947 अर्थ, बॉलिवूड हॉलिवूड, ऐलान, दिल कबड्डी, लव्हा आज कल, वेक अप सिद यासारखे राहुलचे सिनेमे गाजले आहेत.