Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding :  जामगरमधील अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला बॉलीवूडकरांनी हजेरी लावली होती. या सोहळा बॉलीवूडकरांनी गाजवला असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. तिन्ही खान, प्रेग्नंट दीपिका, धकधक गर्ल माधुरी या साऱ्यांनी हा सोहळा आनंदानं अनुभवला. पण या सगळ्यात सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं ते कपूरांची नात अन् रणबीर आलियाची लेक राहानं (Raha Kapoor). या सोहळ्याला अनेक स्टारकिर्ड्स उपस्थित होते. करिना आणि सैफअली खानची दोन्ही मुलं तैमूर आणि जेह, शाहरुखचा लेक अब्राहम पण यामध्ये सोशल मीडियावर राहा कपूरचीच चर्चा होत आहे. 


या सोहळ्यातील राहाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अनंत अंबानी सोबतचा तिचा व्हिडिओ, अभिषेक बच्चनसोबतचा राहाचा व्हिडिओ या सगळ्या गोष्टींची नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. 1 ते 3 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी राहा देखील तिच्या आई वडिलांसोबत तिथे पोहचली. मुंबई विमानतळावरच कॅमेऱ्यामध्ये राहाची झलक कैद झाली. 


अनंतसोबत राहाचा व्हायरल व्हिडिओ


अनंत अंबानी सोबत देखील राहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी राहा तिची आई आलिया सोबत होती. या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी वनताराची सफर या बॉलीवूडकरांना करण्यात आली. त्यावेळी राहा आलियासोबत कॅमेऱ्यात कैद झाली. आईसोबत राहाने ट्विनिंग यावेळी केले होते. तसेच तिचा आणि अनंत अंबानीचा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाला. 






अभिषेकसोबत राहाचा व्हिडिओ


प्री-वेडिंगच्या तिसऱ्या दिवशी रणबीर कपूरचा वनतारा येथील गजवान येथे लंच करतानाचा व्हिडिओ समोर आला. या व्हडिओमध्ये राहा प्रिंटेड पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या फ्रॉकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. यावेळी अभिषेक राहाला भेटला. त्यावेळी त्याने तिचे गाल ओढले तेव्हा रणबीरने तिला आपल्या हातात धरले होते आणि राहा थोडी घाबरल्याचं पाहायला मिळालं. तिने लगेच रणबीरला मिठी मारली. 






ही बातमी वाचा : 


Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding : मुलगा, लेक, जावई अन् सून; अनंत-राधिकाच्या प्री वेंडिगमध्ये कपूरांचा 'फॅमिली फोटो'