Parineeti Chopra and Raghav Chadha Spotted: राजकीय नेते आणि बॉलिवूडच्या अभिनेत्री यांच्या अफेअरच्या गोष्टी या काही नव्या नाहीत. अनेकदा त्यांची भेट होते आणि गाठी कायमस्वरुपी बांधल्या जातात. अशीच एक बातमी समोर आली असून आम आदमी पार्टीचे प्रसिद्ध नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हे मुंबईत एकत्रित स्पॉट झाले आहेत. बुधवारी हे दोघं एकत्रित डिनर घेताना दिसून आले होते, तर आज त्यांनी एकत्रित लंच केल्याचं समोर आलं. या सलग भेटींमुळे या दोघांचं अफेअर सुरू आहे का अशी जोरात चर्चा रंगली आहे.


परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्डा या दोघांनी आज दुपारी एकत्रित लंच केलं. मुंबईतील एका हॉटेलमध्ये लंच केल्यानंतर राघव चढ्ढा हे पहिल्यांदा बाहेर आले आणि काही वेळांनी परिणीता बाहेर आली. परिणीता या लंच डेटला कॅज्युअल लूकमध्ये पोहोचली होती. तिने काळ्या क्रॉप टॉपसह काळी पँट परिधान केली होती.


बुधवारी संध्याकाळी दोघेही पांढऱ्या शर्टमध्ये दिसले होते. हा फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनीही हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. आणि आज लगेच दुपारी हे चित्र समोर आलं. 


 






Parineeti Chopra and Raghav Chadha Spotted: ब्रिटनमध्ये दोघांचाही सन्मान 


जानेवारी महिन्यात अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांना 'इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्स' या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. एखाद्या भारतीयाला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे. नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अॅल्युमनी युनियनच्या (NISAU) वतीनं ब्रिटीश कौन्सिल इन इंडिया आणि ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभाग (DIT) यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान आयोजित केला होता. ब्रिटीश विद्यापीठात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा सोहळा पार पडला. 


परिणीती चोप्रा ब्रिटनच्या मँचेस्टर स्कूलची विद्यार्थिनी होती. राघव चढ्ढा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. परिणीती आणि राघव दोघेही अभ्यासात हुशार होते आणि त्यांच्या वर्गात टॉपरही होते. रिलेशनशिप स्टेटसबद्दल बोलायचे झाले तर परिणीती सध्या सिंगल आहे आणि 34 वर्षीय राघव चढ्ढा हे अद्याप अविवाहित आहेत. 


ही बातमी वाचा: