मुंबई: अभिनेता शाहरुख खानच्या बहुचर्चित रईस सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा आतापासूनच रंगली आहे. रईसचा ट्रेलर हटके पद्धतीने रिलीज करण्याची तयारी शाहरुखच्या रेड चिलीज इंटरटेन्मेंट, एक्सेल इंटरटेन्मेंट आणि यूएफओ डिजिटल सिनेमाने केली आहे.

येत्या 7 डिसेंबरला हा ट्रेलर रिलीज होणार आहे. मात्र त्यापूर्वीच ट्रेलरचा काही भाग रिलीज केला आहे. या व्हिडीओत शाहरुख खान येत्या 7 डिसेंबरला रईसचा ट्रेलर रिलीज होणार असल्याचं सांगत आहे.


रईसचा ट्रेलर देशातील 3500 सिनेमागृहात एकाचवेळी लाँच करण्यात येणार आहे. बॉलिवूडमध्ये हा नवा विक्रम असेल.

यावेळी शाहरुख खान रईसच्या ट्रेलरच्या निमित्ताने दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, जयपूर, अहमदाबाद, इंदोर आणि मोगा (पंजाब) इथल्या प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हा संवाद होईल.

रईस या सिनेमात अभिनेता शाहरुख खान आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान मुख्य भूमिकेत आहेत. येत्या 26 जानेवारी 2017 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.



संबंधित बातम्याः
यापुढे पाक कलाकारांना सिनेमात घेणार नाही : करण जोहर

शाहरुखच्या 'रईस'मधून माहिरा खानचा पत्ता कट?