मुंबई : बॉक्स ऑफिसवर दोन तगड्या सुपरस्टारची टक्कर पाहायला मिळत आहे. किंग खान शाहरुखचा ‘रईस’ आणि हृतिक रोशनचा ‘काबिल’ हे दोन चित्रपट भिडत आहेत. मात्र बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहता ‘रईस’च रईस ठरत आहे. राहुल ढोलकियाचं दिग्दर्शन असलेला हा रईस क्राईम थ्रिलर आहे.


शाहरुख खान, नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या रईसने चार दिवसात मिळून 75.44 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.

'रईस'ची कमाई :

बुधवारी - 20.42 कोटी
गुरुवार - 26.30 कोटी
शुक्रवार - 13.11 कोटी
शनिवार - 15.61 कोटी
एकूण - 75.44 कोटी

यामी गौतम आणि हृतिक रोशन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘काबिल’ सिनेमाच्या तीन दिवसांच्या कमाईची आकडेवारी हाती आली आहे. संजय गुप्ता यांचं दिग्दर्शन असलेला आणि राकेश रोशन यांची निर्मिती असलेला ‘काबिल’ सूडपटाचा प्रवास मांडतो.

'काबिल'ची कमाई :

बुधवारी - 10.43 कोटी
गुरुवार - 18.67 कोटी
शुक्रवार - 9.77 कोटी
एकूण - 38.87 कोटी