Happy Teacher's Day : आज देशभरात शिक्षक दिन साजरा केला जात आहे. शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्री निम्रत कौर (Nimrat Kaur) आणि राधिका मदन (Radhika Madan) यांच्या 'हॅप्पी टीचर्स डे' (Happy Teacher's Day) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बदलापूर, स्त्री आणि हिंदी मीडियम या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक दिनेश विजन यांनी त्यांच्या 'हॅप्पी टीचर्स डे' या त्यांच्या आगमी चित्रपटाची घोषणा केली. राधिका मदन आणि निम्रत कौर या अभिनेत्री या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. आयुष्यात शिक्षक महत्त्वाचा असतो, हे टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. पण नंतर सोशल मीडियावर या शिक्षकांच्या वैयक्तिक आयुष्यावर कशा प्रकारे कमेंट्स केल्या जातात हे देखील दाखवण्यात आले आहे.
'हॅप्पी टीचर्स डे' हा चित्रपट 5 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. मिखिल मुसळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. दिनेश विजन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. राधिका मदनने या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'या शिक्षक दिनी आम्ही तुमच्यासाठी हॅप्पी टीचर्स डे घेऊन आलो आहोत. या चित्रपटाचे शूटिंग आजपासून सुरू होत आहे.'
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: