Radhe Shyam : बाहुबली स्टार प्रभासच्या (Prabhas) आगामी 'राधे श्याम' (Radhe Shyam) सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत आहेत. 14 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जानेवारीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या अनेक सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण 'राधे श्याम' सिनेमाच्या निर्मात्यांनी अद्याप सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
राधे श्यामच्या निर्मात्यांना OTT रिलीजसाठी 400 कोटींची ऑफर!
राधे श्यामच्या निर्मात्यांना ओटीटी रिलीजसाठी 400 कोटींची ऑफर मिळाली आहे. अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. जगभरात हा सिनेमा 14 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. प्रभाससोबत पूजा हेडगेदेखील मुख्य भूमिकेत आहे. 'राधे श्याम' हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट तमिळ, तेलुगु, मल्याळम सोबत हिंदी भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात प्रभासचा रोमॅंटिक अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमारने केले आहे.
संबंधित बातम्या
Heropanti 2 Release Date: ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार टायगर श्रॉफचा 'हीरोपंती 2'
Prithviraj Movie Postponed : 'पृथ्वीराज' सिनेमाला कोरोनाचा फटका, रिलीज डेट ढकलली पुढे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha