R Madhavan : अभिनेता आर माधवन (R Madhavan) सध्या त्याच्या 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' या चित्रपटाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे खूप आनंदी आहे. दरम्यान, त्याच्या आनंदात आता आणखी भर पडली आहे. अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत याने स्विमिंगमध्ये नॅशनल रेकॉर्ड मोडला आहे. स्विमिंगमध्ये नवा विक्रम प्रस्थापित करत त्याने आपल्या देशाचे आणि वडिलांची मान गर्वाने उंच केली आहे. अभिनेत्याने रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
आर माधवनने या स्पर्धेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये वेदांतने भाग घेतला होता. वेदांतच्या नावावर 1500 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेतही विक्रम केला आहे. आपल्या मुलाचा व्हिडीओ शेअर करत माधवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, नॅशनल ज्युनियर रेकॉर्ड 1500 मीटर फ्रीस्टाईल मोडला!’ माधवनने आपल्या ट्विटमध्ये वेदांतला टॅग केले आहे.
पाहा पोस्ट :
या व्हिडीओमध्ये, वेदांत पोहताना दिसत आहे. अवघ्या 16 मिनिटांत त्याने अद्वैत पेजचा 780 मीटरचा विक्रम मोडीत काढला आहे.
चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
मुलाच्या या यशाबद्दल चाहते माधवनचे अभिनंदन करत आहेत. एका चाहत्याने म्हटले, 'वेदांतचे अभिनंदन. माधवन कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण.’ एक चाहता म्हणाला, 'ते पालक भाग्यवान आहेत, जे त्यांच्या मुलांमुळे ओळखले जातात. आपण एक अद्भुत पालक आहात.’ दुसर्याने लिहिले की, 'तुमच्यासारखे आणखी पालक पुढे येतील अशी आशा आहे, खासकरून चित्रपटसृष्टीतून.'
या आधीही जिंकली पदकं
एप्रिलमध्ये, वेदांतने कोपनहेगनमधील डॅनिश ओपनमध्ये पुरुषांच्या 800 मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदक जिंकले. सुवर्णपदक जिंकल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी माधवनचे जोरदार कौतुक केले. या सेलिब्रिटींमध्ये प्रियांका चोप्रा आणि कंगना रनौत सारख्या कलाकारांचा समावेश होता. वेदांतने पदक जिंकल्याची क्लिप शेअर करत माधवनने ट्विट करून आपला आनंद व्यक्त केला होता.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर माधवनचा ‘रॉकेटरी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तो वैज्ञानिक नंबी नारायणच्या भूमिकेत दिसला आहे.
हेही वाचा: