R Madhavan : सध्या संपूर्ण सिनेजगताच्या नजरा 'कान्स फिल्म फेस्टिवल'कडे (Cannes Film Festival 2022) लागल्या आहेत. या महोत्सावात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. बॉलिवूड अभिनेते आर. माधवनदेखील (R Madhavan) 'कान्स फिल्म फेस्टिवल'साठी फ्रान्सला गेले आहेत. आर. माधवन 'कान्स फिल्म फेस्टिवल'साठी खूपच उत्सुक आहेत. त्यांनी नुकताच फ्रान्सच्या निसर्गसौंदर्याची झलक दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 


आर. माधवन यांनी शेअर केलेला व्हिडीओ सूर्यदयाचा आहे. सूर्योदयाच्या व्हिडीओसोबत त्यांनी फ्रान्सच्या निसर्गसौंदर्याची झलकदेखील चाहत्यांना दाखवली आहे. आर. माधवन 75 व्या  'कान्स फिल्म फेस्टिवल'च्या रेड कार्पेटवर त्यांची झलक दाखवण्यासाठी सज्ज आहेत. आर.माधवन यांच्या 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' (Rocketry: The Nambi Effect) या सिनेमाचा प्रीमिअरदेखील यंदाच्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये होणार आहे. 
या सिनेमाची निर्मितीदेखील आर.माधवन यांनीच केली आहे. हा सिनेमा 19 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


आर. माधवनने शेअर केला व्हिडीओ


आर. माधवनने शेअर केलाला व्हिडीओ त्यांनीच शूट केलेला आहे. व्हिडीओमध्ये आर. माधवन एका सुंदर निसर्गसौंदर्याची झलक दाखवताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले आहे, "कान्स फिल्म फेस्टिवलचा पहिला दिवस". 


'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये सहभागी होणार 'हे' कलाकार


75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये दीपिका पदुकोण (Deepika Padukone) मुख्य ज्यूरीचा भाग असण्यासोबत कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या सौंदर्याचा जलवादेखील दाखवणार आहे. तसेच हिना खान, पूजा हेगडे, आदिती राव हैजरी, नयनतारा आणि  ऐश्वर्या राय बच्चनदेखील रेड कार्पेटवर तिचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.





'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये 'या' सिनेमांची होणार स्क्रीनिंग


'कान्स फिल्म फेस्टिवल 2022' मध्ये 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' व्यतिरिक्त निखिल महाजन यांच्या गोदावरी, शंकर कुमार यांच्या 'अल्फा बीटा गामा' बिस्वजीत बोराच्या 'बुंबा राइड', दिग्दर्शक अचल मिश्रा यांच्या 'धुइनो' आणि जयराजच्या 'ट्री फुल ऑफ पेरट्स' सिनेमाची स्क्रीनिंग होणार आहे. आजपासून 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला सुरुवात झाली आहे. 17 ते 28 मे दरम्यान 'कान्स फिल्म फेस्टिवल' पार पडणार आहे.


संबंधित बातम्या


Potra : 'पोटरा' सिनेमातील छकुली देवकरला एक लाखाची मदत; कान्स चित्रपट महोत्सवात सिनेमाची निवड


Cannes Film Festival 2022 : ज्युरींसोबत डिनरला पोहोचली दीपिका पदुकोण, अभिनेत्रीचा ‘कान्स’ लूक होतोय व्हायरल!


Aishwarya Rai Bachchan : ‘कान्स’ सोहळ्यासाठी ऐश्वर्या राय सहकुटुंब रवाना! एअरपोर्टवर दिसला खास ‘फॅमिली’ अंदाज!