Queen Elizabeth : ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं आज वृद्धपकाळानं निधन झालं. त्या 96 वर्षांच्या होत्या. स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एलिझाबेथ यांच्या निधनानंतर  जगभरातील लोकांनी शोक व्यक्त केला. बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 


अभिनेता रितेश देशमुखनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन एलिझाबेथ यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, 'एका युगाचा अंत! अत्यंत कठीण काळातही त्यांनी आपली प्रतिष्ठा सोडली नाही. आज खरोखरच दुःखद दिवस आहे, कुटुंब आणि यूकेच्या लोकांप्रती शोक व्यक्त करतो.'


गायक अदनान समीनं देखील पोस्ट शेअर केली आहे:






अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं एलिझाबेथ यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 




करीना कपूर, अनुष्का शर्मा, सुष्मिता सेन यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहिली.










एलिझाबेथ यांचा जन्म लंडनमध्ये 21 एप्रिल 1926 रोजी झाला. एलिझाबेथ यांचे शिक्षण घरातच झाले. एलिझाबेथ यांचे वडील जॉर्ज यांचे 1952 मध्ये निधन झाले. त्यानंतर एलिझाबेथ यांना 1952 मध्ये ब्रिटनची महाराणी म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सलग सात दशके ब्रिटनची महाराणी म्हणून कामकाज पाहिले. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Queen Elizabeth : सात दशकांचा राजेशाही प्रवास संपला, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन